Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
ड. सभासदत्व
ड.१.१ सभासदत्वासंबंधी पात्रता
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २२ मधील तरतुदीस अधीन राहून फेडरेशनच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पतसंस्थेस खालील अटींची पूर्तता करुन घेतल्यानंतर सभासद करुन घेण्यात येईल.
 1. ती फेडरेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी पतसंस्था असली पाहिजे.
 2. ती भारतीय करार कायद्यानुसार करार करण्यास पात्र असली पाहिजे.
 3. तिने पाच रुपये प्रवेश फी व एका भागाची पूर्ण रक्कम भरली पाहिजे.
 4. तिच्या सभासदत्वाच्या विहीत नमुन्यातील लेखी अर्जाला संचालक मंडळाने मंजूरी दिली असली पाहिजे. (परिशिष्ट ‘ अ ’ मधील सभासदत्वाचा नमुन्यातील अर्ज)
 5. प्रत्येक सभासदाने प्रतीवर्षी फेडरेशनची वार्षिक वर्गणी म्हणून रु. १००/- भरणे आवश्यक आहे व अशी भरणा केलेली रक्कम सभासदास परत देता येणार नाही.
ड. १.२ सभासदत्वासंबंधी अपात्रता
कार्यक्षेत्रातील कोणतीही नागरी सहकारी पतसंस्था खालील कारणास्तव संघाचे सभासद होण्यास अपात्र राहील.
 1. पतसंस्था अवसायानात काढली असल्यास किंवा पतसंस्थेची नोंदणी रद्द झाली असल्यास.
 2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील नियमानुसार अपात्र ठरविले असल्यास.
 3. प्रत्येक सभासदाने प्रतीवर्षी फेडरेशनची वार्षिक वर्गणी म्हणून रु. १००/- भरणे आवश्यक आहे व अशी भरणा केलेली रक्कम सभासदास परत देता येणार नाही. वर्गणी थकबाकीदार सभासदास मागील वर्षाची वर्गणी न भरल्यास तो सभासद अपात्र सभासद म्हणून समजले जाईल.
ड.१.३ सभासद दाखल करुन घेण्याची कार्यपद्धती
 1. परिशिष्ट ‘ अ ’ मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यात अर्ज केलेला असावा.
 2. उपविधी क्र.ड.१.१(३) नुसार एक किंवा अधिक भागांची मागणी केलेली असावी.
 3. बृहन्मुंबईतील सर्व नागरी सहकारी पतसंस्था ज्यांचा नोंदलेला पत्ता बृहन्मुंबईतील आहे अशा सर्व पतसंस्थांना फेडरेशनचे सभासद होता येईल.
 4. सभासदत्वासाठी येणार्‍या प्रत्येक अर्जासोबत संबंधित पतसंस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या ठरावाची एक प्रत व पतसंस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडली पाहिजे. सभासदाचा अर्ज कार्यकारी मंडळाने मंजूर केल्यानंतर सभासदत्व प्राप्त होईल. सभासदत्वासाठी आलेल्या अर्जाचा विचार तीन महिन्याच्या आत होईल. सभासदाने वार्षिक वर्गणी प्रतीवर्षी रु. १००/- ह्या प्रमाणे भरणे आवश्यक आहे.
 5. अर्जदार पतसंस्थेस सभासद करुन घेण्याच्या निर्णय, निर्णयाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत अगर सभासदत्वाकरिता केलेल्या अर्जाच्या तारखेपासून तीन महिन्याच्या आत यापैकी जी मुदत अगोदरची असेल, त्या तारखेपर्यंत निर्णय कळविला पाहिजे. जर असा अर्ज मिळाल्यापासून संस्थेने तीन महिन्याच्या आत अर्जदाराला कोणताही निर्णय कळविला नाही तर अर्जदाराला संस्थेचा सभासद म्हणून दाखल करुन घेण्यात आले असल्याचे मानण्यात येईल.
 6. सभासद म्हणून दाखल करुन घेण्यासाठी एखाद्या नागरी सहकारी पतसंस्थेकडून आलेला अर्ज
 7. किंवा सभासदत्व मिळविण्यासाठी भरलेली रक्कम स्वीकारण्यास संस्थेने नकार दिल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ (१-अ) अन्वये विहीत केलेल्या नमुन्यात अशी पतसंस्था सभासदत्व मिळविण्यासाठी आवश्यक रक्कमेसह निबंधकाकडे अर्ज करु शकेल. आणि निबंधकाने जर सदर अर्ज, रक्कम मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत अर्जदार पतसंस्थेस कोणताही निर्णय कळविला नाही तर, ती अर्जदार पतसंस्था संस्थेची सभासद झाली असे मानण्यात येईल.
ड. १.४ भाग दाखला
फेडरेशनने प्रत्येक सभासदास विनाशुल्क भाग दाखला दिला पाहिजे. अशा दिलेल्या भाग दाखल्यावर भागांची संख्या व धारण भागाचा सलग अनुक्रमांक दिला पाहिजे. भाग दाखल्यावर संस्थेचे अध्यक्ष, मानद सचिव आणि व्यवस्थापक समितीने रितसर अधिकार दिलेल्या संचालक मंडळाच्या समिती सदस्य यांनी सही केली असली पाहिजे. अशा भाग दाखल्यावर संस्थेचे सील (seal ) असले पाहिजे.
ड. १.५ भाग हस्तांतरण
 1. भाग हस्तांतरण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २९ व ३० आणि त्या खाली केलेल्या नियमानुसार केले जाईल.
 2. संचालक मंडळाच्या संमतीने सभासदाला ज्याच्या नांवावर हस्तांतरण करावयाचे आहे, असे भाग तीन वर्षे धारण केल्यानंतर हस्तांतरीत करीता येईल.
 3. ज्याच्या नांवावर भाग हस्तांतरण करावयाचे आहे, अशा पतसंस्थेचे नांव भंग हस्तांतरण नोंदणी पुस्तकात दाखल केल्याखेरीज आणि प्रत्येक हस्तांतरणासाठी दाखल्यामागे रुपये दहा शुल्क दिल्याखेरीज कोणतेही हस्तांतरण पूर्ण झाले असे समजण्यात येणार नाही.
ड.१.६ भाग हस्तांतरण खालील कारणास्तव नाकरता येईल
 1. सभासद पतसंस्था उपविधी क्र. ड.१.१ मधील अटींची पूर्तता करीत नसेल तर.
 2. सभासद पतसंस्था धारण केलेले सर्व भाग हस्तांतरीत करीत नसेल तर.
 3. सभासद पतसंस्था संस्थेची लाभार्थी असेल तर.
ड.१.७ सभासदत्व बंद होणे
सभासदत्व खालील कारणाने संपुष्टात येईल.
 1. सभासद पतसंस्था सभासदाने राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर झाल्यास.
 2. सभासद पतसंस्था सभासदाचे सर्व भाग हस्तांतरण केल्यास.
 3. उपविधी क्र.ड.१.१ च्या तरतुदीचा भंग झाल्यास.
 4. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ३५ व त्या खलील नियम २८ व २९ यातील तरतुदीनुसार काढून टाकल्यास.
 5. सभासद पतसंस्था विसर्जित झाल्यास/संस्था नोंदणी पत्ता बृहन्मुंबई बाहेरील मंजूर झाल्यास.
 6. सर्वसाधारण सभेने सभासदत्व रद्द केल्यास.
ड.१.८ सभासदत्वाचा राजीनामा
सभासद पतसंस्था आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन स्वतचे भाग भांडवल संचालक मंडळाचे संमतीने परत घेऊ शकेल. मात्र असे करण्यापूर्वी त्याचेकडे येणे असलेल्या रकमांची पुर्नफेड झाली असावी. अशा प्रयोजनासाठी वित्तीय वर्षात संस्थेने परत केलेल्या भाग भांडवलाची एकूण रक्कम ही लगत पूर्वीच्या वित्तीय वर्षात शेवटच्या दिवशी संघाचे भरणा झालेले भाग भांडवल असेल याच्या दहा टक्के रक्कमेपेक्षा अधिक असणार नाही. तसेच सभासदत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तीन वर्षांपर्यंत पुन्हा सभासदत्व देता येणार नाही.
ड.१.९ सभासदाची हकालपट्टी
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३५ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २८ व २९ च्या तरतुदीस अधीन राहून, सभासदाची खालील कारणास्तव हकालपट्टी करण्यात येईल :
 1. ती सतत वर्गणी थकबाकीदार असल्यास.
 2. त्याने जाणूनबुजून संस्थेस फसविले असल्यास.
 3. ती दिवाळखोर अथवा कायद्याने अपात्र ठरल्यास.
 4. त्याने फेडरेशनच्या हितास व हितसंबंधास तसेच व्यवस्थित चालणार्‍या कामास व प्रतिष्ठेस बाधा आणणारी कृत्य केल्यास.
 5. सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ च्या नियम ४५ च्या तरतुदीच्या विरुद्ध वर्तन केल्यास, काढून टाकलेल्या सभासदाचे धारण केलेले भाग जप्त करण्यास पात्र राहतील.
ड.१.१० हकालपट्टी केलेल्या सभासदास पुन्हा प्रवेश
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ३५ (२) च्या तरतुदींना अधीन राहून हकालपट्टी केलेल्या सदस्यास पुन्हा सभासद म्हणून दाखल करुन घेता येईल.
ड.१.११ सभासदाची जबाबदारी
सभासदांची जबाबदारी महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० चे कलम ३३ च्या तरतुदीस पात्र राहून खालीलप्रमाणे राहील.
 1. फेडरेशनच्या सभासदाची जबाबदारी त्याच्या नांवे असलेल्या भागाच्या किंमती इतकी मर्यादित राहील.
 2. सभासदाच्या बाबतीत त्या तारखेस सभासदत्व संपुष्टात आले असेल त्या तारखेपासून दोन वर्षे मुदतीपर्यंत राहील.
ड.१.१२ भाग भांडवल, लाभांष व ठेवीवरील संस्थेचा हक्क
सभासदाकडून अगर माजी सभासदाकडून फेडरेशनचे येणे असेल तर, त्यापोटी फेडरेशन सभासदाच्या नांवे असलेल्या भागावर, लाभांषावर व ठेवीवर संघाचा प्रथम अग्रहक्क व बोजा राहील. फेडरेशन केव्हाही सभासदाच्या जबाबदारीपोटी त्यास देय असलेली रक्कम वळती करुन घेईल.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved