Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
इ.१.१ सर्वसाधारण सभा
 1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील तयार केलेले नियम यांचे अधीन राहून संस्थेचे व्यवहाराबाबतचे सर्व अधिकार सर्वसाधारण सभेकडे राहतील.
 2. सर्वसाधारण सभा दोन प्रकारच्या असतील.
  १) वार्षिक सर्वसाधारण सभा
  २) विशेष सर्वसाधारण सभा.
 3. ज्या त्या वेळी अंमलात असलेल्या नियमानुसार संस्थेचे वर्षाचे हिशोब पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या तारखेनंतर येणार्‍या पुढील तीन महिन्याच्या कालावधीच्या आत संस्था आपल्या सभासदांची एक सर्वसाधारण सभा बोलावील.
 4. विशेष सर्वसाधारण सभा खालील परिस्थितीत बोलविण्यात येईल.
  (अ) अध्यक्षास अगर संचालक मंडळाचे बहुमताने अशी सभा केव्हांही बोलविता येईल.
  (ब) संस्थेच्या सभासदांपैकी १/५ किंवा १०० सभासद यापैकी जी संख्या जास्त असेल एवढया
  सभासदांनी लेखी मागणी केल्यास.
  (क) कलम ७६ नुसार निबंधकाने सूचना केली असल्यास.
  (ड) संघीय संस्थेच्या संचालक मंडळाने सूचना केली असल्यास वरील ब, क व ड नुसार
  बोलवावयाची सभा अशा तऱहेने मागणी सूचना प्राप्त झाल्यापासून तीन महिन्याच्या आत बोलविण्यात येईल. अशी सभा सात दिवसांच्या नोटीसीने बोलविता येईल.
इ. १.२ वार्षिक सर्वसाधारण सभेची कामे
  वार्षिक सर्वसाधारण सभेची कामे खालीलप्रमाणे असतील.
 1. मागील वार्षिक सर्वसाधारण तसेच विशेष सर्वसाधारण सभेची इतिवृत्ते वाचणे व कायम करणे.
 2. संस्थेचा ताळेबंद, नफा-तोटयाचा हिशेब, लेखापरिक्षण अहवाल व समितीचा अहवाल यास मान्यता देणे.
 3. संचालक मंडळाने सुचविलेल्या उपविधी दुरुस्तीस मंजूरी देणे.
 4. नफा वाटणी मंजूर करणे व लाभांष जाहीर करणे.
 5. आवश्यक असल्यास अंतर्गत हिशोब तपासणीसाठी योग्य त्या पात्रतेच्या अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणूक करणे.
 6. वार्षिक अंदाजपत्रक संमत करणे.
 7. संचालक मंडळाची निवडणूक झाली असल्यास निवडून आलेल्या संचालकांची नांवे जाहीर करणे.
 8. पुढील वर्षासाठी बाहेरील कर्ज मर्यादा निश्चित करणे.
 9. सभासद हकालपट्टी बाबत निर्णय करणे.
 10. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.
टिप : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपूर्वी तीन दिवस आधी सभासदांकडून संस्थेच्या सर्वसाधारण कामकाजासंबंधी प्राप्त झालेल्या विषयावर विचार करणे, मात्र असे विषय उपविधी सुधारणा व सभासद करण्यासंबंधीचा विषय नसावा.
इ. १.३ विशेष सर्वसाधारण सभेची कामे
  विशेष सर्वसाधारण सभेच्या नोटीसीमध्ये अंतर्भूत असलेल्या विषयापुरतेच विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज राहील.
इ.१.४ ठराव
ज्या विषयाबाबत अधिनियम, नियम व उपविधीत विशिष्ट तरतूदी असतील असे विषय वगळता इतर बाबतीत ठराव मंजूर करताना हात वर करुन मताधिक्य अजमावले जाईल. एखाद्या सभासदानी गुप्त मतदानांची मागणी केली तर त्याप्रमाणे त्वरीत मतदान सभाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल. अध्यक्ष मतमोजणीचा निकाल जाहीर करील.
इ.१.५ इतिवृत्त
सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक यांनी सर्वसाधारण सभा झाल्यापासून एक महिन्याच्या आत लिहीले पाहिजे. आणि त्यासाठी इतिवृत्त नोंद वहीमध्ये नोंदवून अध्यक्षांची स्वाक्षरी घेतली पाहिजे.
इ.१.६ वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा
 1. वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस सभासदाच्या नोंदलेल्या पत्त्यावर संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके आणि विषय पत्रिका सभेच्या तारखेच्या १४ दिवस अगोदर पाठविली जाईल. तसेच सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावली जाईल. नोटीसीची एक प्रत निबंधक यांचेकडे सादर करणे बंधनकारक राहील.
 2. विशेष सर्वसाधारण सभेच्या नोटीशीत मागणी केलेल्या विषयांचा अंतर्भाव करुन सभा बोलविली जाईल. अशा सभेत विषयपत्रिकेवर मागणी केलेलाच विषय राहील. सभासदाचे नोंदलेल्या पत्त्यावर अशी नोटीस सभेच्या तारखेपूर्वी कमीत कमी ७ दिवस अगोदर पाठविली जाईल. तसेच सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर लावली जाईल.
 3. कोणत्याही सर्वसाधारण सभेची नोटीस मिळाले नाही हे कारण सभा तहकूब करण्यासाठी अथवा पुढे ढकलण्यासाठी पुरेसे नाही.
 4. कोणत्याही सर्वसाधारण सभेच्या नोटीसीत सभेची जागा, तारीख व वेळ याचा स्पष्ट उल्लेख असेल. तसेच सदरहू नोटीसीत कोरम अभावी तहकूब झालेलया सभेची जागा, तारीख व वेळ यांचा स्पष्ट उल्लेख असेल.
 5. वार्षिक सर्वसाधारण/विशेष सर्वसाधारण सभेचे नोटीस मानद सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत स्वत संस्थेचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने दिली जाईल.
इ.१.७ वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष साधारण सभा गणपूर्ती (कोरम)
कोणत्याही सर्वसाधारण सभेस एकूण सभासद संख्येच्या १/५ अगर २५ यापैकी जी संख्या कमी असेल इतके सभासद असले म्हणजे गणपूर्ती झाली असे समजण्यात येईल.
इ.१.८ वार्षिक सर्वसाधारण सभेची तहकूबी आणि विशेष सर्वसाधारण सभा रद्द करणे :
 1. जर वार्षिक सर्वसाधारण सभा गणपूर्ती अभावी होऊ शकली नाही तर, नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे अर्ध्या तासासाठी तहकूब केली जाईल. अशी तहकूब केलेली सभा नंतर भरल्यावर सभेच्या मूळ विषय पत्रिकेमध्ये समाविष्ट केलेल्या विषयावर गणपूर्ती (कोरम) असो अगर नसो त्यावर विचार केला जाईल.
 2. सभासदांच्या लेखी मागणीवरुन बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा सभेच्या नियोजित वेळेपासून एक तासात गणपूर्ती होऊ शकली नाही तर ती सभा रद्द होईल.
 3. विषय पत्रिकेवरील विषय वेळेत पूर्ण न झाल्यास नियम ६० नुसार सभा घेता येईल.
अ.१.९ सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष
संचालक मंडळाचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष असतील. त्यांचे गैरहजेरीत उपाध्यक्षांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात येईल. आणि दोघांच्या गैरहजेरीत हजर असलेले व मतदानांचा हक्क असलेले सभासद आपल्यापैकी एकाची निवड सभेच्या अध्यक्ष पदासाठी करतील.
इ.१.१० मतदानाचा अधिकार
 1. कितीही भाग धारण केले असले तरी प्रत्येक सभासदाला फक्त एकच मत देण्याचा अधिकार राहील.
 2. सम समान मताचे प्रसंगी अध्यक्षांस सभासद म्हणून असलेल्या मताशिवाय एक निर्णायक मत राहील.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved