Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
फ.१.१ संचालक मंडळ
संचालक मंडळ 29 सदस्यांचे राहील, त्याचा तपशिल खालीलप्रमाणे :-
 
फेडरेशनचे सरव्यवस्थापक किंवा महाव्यवस्थापक किंवा व्यवस्थापक (पदसिद्ध)
प्रत्येक को-ऑप. वार्डातील सभासद पतसंस्थांनी निवडून दिलेला प्रत्येकी एक प्रतिनिधी (निवडणूकीने) २०
महिला प्रतिनिधी (निवडणूकीने)
मागासवर्गीय प्रतिनिधी (निवडणूकीने)
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी (निवडणूकीने)
भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव प्रतिनिधी (निवडणूकीने)
आर्थिकदृष्टया दुर्बल प्रतिनिधी (निवडणूकीने)
सहकार व तज्ञ (स्विकृत)
कर्मचारी प्रतिनिधी (स्विकृत)
  एकूण २९
 
टिप  :- स्विकृत व पदसिद्ध संचालकांना पदाधिकाऱयांना निवडणूकीत मतदान करणे आणि किंवा निवडणूकीत भाग घेणे या शिवाय सर्व अधिकार निवडून आलेल्या इतर संचालकांप्रमाणे राहील.
फ.१.२ फेडरेशनचे सर्वसाधारण कामकाज २९ जणांचे संचालक मंडळ पहातील.
फ.१.३ फेडरेशनचे व्यवस्थापन आणि व्यवहार सर्वसाधारणपणे पुढील समिती, पदाधिकारी आणि अधिकारी पाहतील.
 1. सर्वसाधारण सभा
 2. संचालक मंडळ
 3. पदाधिकारी
 4. सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक
वरीलपैकी कोणतेही पदाधिकारी आणि अधिकारी हे त्यांना उपविधीनुसार मिळालेल्या अधिकारानुसार एखाद्या उपसमिती, अधिकारी किंवा कर्मचाऱयांस विविध प्रकारचे अधिकार प्रदान करु शकतील.
फ.१.४ समित्या - उपसमित्या
फेडरेशनच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने संचालक मंडळ विविध प्रकारच्या समित्यांचे व उपसमित्यांचे गठन करुन त्यांना आवश्यकतेनुसार कार्यकक्षा ठरवून अधिकार प्रदान करेल.
 1. फेडरेशनचे एकूण कामकाज खालील समित्यांद्वारे सर्वसाधारणपणे पाहिले जाईल.
  (अ)  कार्यकारी समिती
  (ब)  शिक्षण - प्रशिक्षण समिती
  (क)  थकबाकी वसुली समिती व इत्यादी आवश्यक समित्या.
 2. फेडरेशनचे इतर कामकाज सुद्धा विविध उपसमित्यांद्वारे सर्वसाधारणपणे पाहिले जाईल.
वरीलपैकी कोणतेही पदाधिकारी आणि अधिकारी हे त्यांना उपविधीनुसार मिळालेल्या अधिकारानुसार एखाद्या उपसमिती, अधिकारी किंवा कर्मचाऱयांस विविध प्रकारचे अधिकार प्रदान करु शकतील.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved