Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
(१) कार्यकारी समिती
या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. या समितीची सभा दरमहा घेण्यात येईल व या समितीमध्ये फेडरेशनचे सर्वसाधारणपणे तातडीचे, आवश्यक, धोरणात्मक अशाप्रकारचे कामकाज केले जाईल. या समितीवी संख्या निमंत्रित सदस्य सोडून ११ पेक्षा जास्त असणार नाही.
(२) शिक्षण - प्रशिक्षण समिती
या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. सर्वसाधारणपणे ही समिती पतसंस्थांना त्यांचे पदाधिकारी संचालक, अधिकारी-कर्मचारी व पतसंस्थांचे सभासद ह्यांना सहकाराचे व प्रामुख्याने पतसंस्थांचे संदर्भात शिक्षण-प्रशिक्षणाचे सर्व कामे अग्रक्रमाने करील. या समितीची संख्या जास्तीत जास्त निमंत्रितांशिवाय ११ पेक्षा जास्त असणार नाही.
(३) थकबाकी वसुली समिती
या समितीमध्ये फेडरेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य असतील. तसेच आवश्यकता भासल्यास विविध समित्या उपसमित्यांचे प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेता येईल. सर्वसाधारणपणे ही समिती पतसंस्थांना त्यांचे पदाधिकारी-संचालक, अधिकारी-कर्मचारी व पतसंस्थांचे सभासद ह्यांना थकबाकी न होणेसाठी व झालेली थकबाकी वसुल करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व काम अग्रक्रमाने करील. या समितीची सभा दरमहा घेण्यात येईल व या समितीची संख्या जास्तीत जास्त निमंत्रितांशिवाय ११ पेक्षा जास्त असणार नाही.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved