Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
को-ऑप. वॉर्ड समिती, जिल्हा समिती, उपविधी समिती, कार्यक्रम समिती इत्यादी आवश्यक उपसमित्या फेडरेशनचे संचालक मंडळ वेळोवेळी, विशिष्ट कालावधीसाठी तयार करील. ह्या उपसमित्यांमधील सदस्यांची संख्या, त्यांचे नांव व पदनाम, कार्यकक्षा व द्यावयाचे अधिकार व इतर अनुषंगिक बाबी फेडरेशन वेळोवेळी ठरवील. टिप :
१. फेडरेशन, समित्या व उपसमित्या यांचे काम आणखी गतिमान करण्यासाठी व पतसंस्थांना सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी बृहन्मुंबईत को-ऑप. वॉर्ड व जिल्हा स्तरावर कार्यालये चालू करील. व त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा पुरविल.
२. सर्व समित्यांचे अध्यक्ष हे फेडरेशनचे अध्यक्षच राहतील.
फ.१.५ संचालक मंडळाची निवडणूक
 1. संचालक मंडळाची निवडणूक परिशिष्ट ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या निवडणूक नियमानुसार घेतली जाईल.
 2. संचालक मंडळाची मुदत ५ वर्षे राहील.
फ.१.६ अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव यांची निवड
 1. नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा ३० दिवसाच्या आत बोलावली जाईल, निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव ह्यांची आवश्यक ५ वर्षासाठी या सभेत निवड केली जाईल.
 2. या सभेच्या अध्यक्षास स्वतच्या मताव्यतिरिक्त एक निर्णायक मत राहील. या निर्णायक मताचा वापर अध्यक्षांच्या निवडणूकीत करता येणार नाही. अशा वेळी चिठ्ठया टाकून निर्णय घेण्यात येईल.
फ. १.७ संचालक पदाच्या निवडणूकीसाठी पात्रता
 1. संचालक मंडळाच्या निवडणूकीत भाग घेऊ इच्छिणार्‍या सभासद पतसंस्था ज्या वर्षात निवडणूक व्हावयाची असेल त्यापूर्वी संपणार्‍या वर्षात ती स् सभासद संस्था होऊन कमीत कमी दोन वर्षे पूर्ण झालेली असलेली पाहिजे.
 2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्त्याखा त्याखालील नियम व तरतुदीनुसार निवडणूक लढविण्यास ती अपात्र असता कामा नये.
फ.१.८ संचालक पद रिकामे होणे.
  संचालक पद खालील कारणास्तव संपुष्टात आले असे मानले जाईल.
 1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ फफ आणि नियम १९६१ चा नियम अपात्र झाल्यास.
 2. तो गैरहजेरी बदल रजा न घेता सलग तीन संचालक मंडळाच्या सभांना गैरहजर राहिल्यास. व निबंधकाने कलम ७८ अन्वये कमी केल्यास.
 3. ती पतसंस्था अवसायनात निघाली असल्यास.
 4. सभासदाने राजीनामा देऊन तो स्वीकृत झाल्यास.
 5. तो नादार झाल्यास अथवा कायदेशीररित्या अपात्र ठरल्यास.
 6. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नियम १९६१ व संघाच्या उपविधीनुसार संचालक मंडळावरील सोपविण्यात आलेल्या जबाबदार्‍या आणि कर्तव्य पार पाडण्यास कसूर झाल्यामुळे संघाच्या हितास हानी पोहचल्यास ती भरुन देण्यास सर्व संचालक संयुक्तपणे व वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. प्रत्येक संचालकास शासनाने विविर्दिष्ट केलेल्या नमुन्यातील बंधपत्र पदग्रहन केल्यापासून १५ दिवसाचे आत द्यावे लागेल. तसे न केल्यास त्याचे ते पद रिक्त झाल्याचे समजण्यात येईल. या बाबतीतील संघाच्या नुकसानीसाठी संबंधित संचालक मंडळ व संचालकांची जबाबदारी निश्चित करण्याचे अधिकार निबंधकांना राहतील.
फ.१.९ संचालक मंडळावरील रिकामी जागा भरणे :
 1. सदस्याचा मृत्यू, उपविधीतील बदल अगर इतर कारणामुळे संचालक मंडळावरील रिकाम्या झालेल्या जागा संचालक मंडळास स्विकृतीने भरता येतील. अशा सदस्यांची संचालक मंडळावरील मुदत संचालक मंडळाच्या शिल्लक राहिलेल्या कालावधी इतकीच राहील.
 2. वरील कलम फ.१.९ (१) मध्ये काहीही नमूद असले तरी संचालक मंडळावरील राखीव जागा पंचवार्षिक निवडणूकीच्या वेळी उमेदवारी अर्ज न आल्याने रिक्त राहिल्या असतील तर अशा जागा संचालक मंडळ स्विकृतीने भरेल. मात्र सदरची माहिती सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याची जबाबदारी संचालक मंडळाची राहील.
 3. संचालक मंडळाच्या रिक्त झालेल्या जागा दोन महिन्याच्या आत भरण्यासाठी उचित कारवाई संचालक मंडळाने केली पाहिजे.
फ. १.१० संचालक मंडळाच्या सभा व त्यांची सूचना
जरुरीप्रमाणे संचालक मंडळाच्या सभा बोलविण्यात येतील. मात्र तीन महिन्यातून किमान एक तरी सभा होणे आवश्यक राहील. संचालक मंडळाच्या नोटीसीबरोबर सभेची विषय पत्रिका टाचनासह सभेच्या तारखेपूर्वी ७ दिवस अगोदर आणि तातडीच्या सभेच्या तारखेपूर्वी तीन दिवस अगोदर संचालकांना पाठविण्यात येईल. या सभेची सूचना मानद सचिव अध्यक्षांशी सल्लामसलत करुन पाठवतील. सदर सभेची नोटीस सर्व संचालकांना पोच करण्याची जबाबदारी मानद सचिव किंवा सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/ व्यवस्थापकाची राहील.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved