Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
फ.१.११ गणपूर्ती
संचालक मंडळाचे निम्याहून जास्त संचालक हजर असले म्हणजे गणपूर्ती (कोरम) झाली असे समजण्यात येईल. सभेसाठी ठरविलेल्या वेळेनंतर एक तासात गणपूर्ती न झाल्यास सभा रद्द करण्यात येईल.
फ.१.१२ संचालक मंडळाचे अधिकार व जबाबदार्‍या
संचालक मंडळाचे अधिकार व जबाबदार्‍या खालीलप्रमाणे राहतील.
 1. नवीन सभासदांना प्रवेश देणे.
 2. फेडरेशनच्या सर्व पगारी नोकरांची नेमणूक करणे, वेतन व इतर भत्ते ठरविणे, सेवेत कायम करणे, त्यांना तात्पुरते कामावरुन दूर करणे, दंड करणे आणि कामावरुन काढून काढणे.
 3. पतसंस्थांची गाऱहाणी ऐकणे व त्याची विल्हेवाट लावणे.
 4. हिशोबावर देखरेख ठेवणे व ते पडताळून पाहणे.
 5. खर्चास मंजूरी देणे.
 6. पतसंस्थांच्या थकबाकी संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे, वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करणे व त्याकरिता सहकार खाते महाराष्ट्र शासन, यांना योग्य तो पत्रव्यवहार करणे.
 7. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्या नियुक्तीकरीता प्रस्ताव तयार करून निबंधकांना सादर करणे.
 8. आवश्यकता भासेल तेव्हा फेडरेशनच्या वतीने दावे दाखल करणे, प्रतिवादी म्हणून दावे चालविणे आणि त्या बाबतीत तडजोड घडवूण आणणे.
 9. फेडरेशनचे हेतु साध्य करण्यासाठी जरूर ती सर्व कामे हाती घेणे.
 10. सभासद पतसंस्थांच्या अडचणींचा विचार करणे.
 11. फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभैपुढे ठेवण्यासाठी वार्षिक ताळेबंद पत्रक व लेखअप परिक्षण अहवाल नफा - तोटा पत्रक, व इतर अनुषंगिक पत्रके तयार करणे.
 12. हिशोब तपासणी अहवाल विचारात घेणे, आणि हिशोब तपासणिसाने दाखवूद दिलेले दोष सुधारणे.
 13. आवश्यकतेनुसार विविध पतसंस्थांच्या व इतर संस्थांच्या वार्षिक सभअंना प्रतिनिधी पाठविणे, त्यांच्या संचालक मंडळावर प्रतिनिधी पाठविणे तसेच जरुरीप्रमाणे विविध स्तरावर होणार्‍या चर्चेसाठी, अधिवेशनासाठी प्रतिनिधी पाठविणे.
 14. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खाली तयार केलेले नियम आणि उपविधी याच्या तरतुदीनुसार उभारलेल्या विविध भिन्न निधीचा विनियोग करणे.
 15. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम ५४ व ५५ च्या तरतुदीच्या उपबंधास अधीन राहून संघाच्या निधीची गुंतवणूक करणे.
 16. फेडरेशनची रोख शिल्लक, स्थावर व जंगम मालमत्ता आणि वाहतुकीतील रोख रक्कमेचा विमा उतरविणे व सदर बाबी विमा संरक्षित करणे.
 17. बृहन्मुंबईतील सर्व को-ऑप वार्ड व जिल्हा समित्या नियुक्त करणे. तसेच शिक्षण प्रशिक्षण समिती, थकबाकी वसुली समिती, कार्यकारी समिती व इतर आवश्यक निरनिराळया विषयाकरिता समित्या नेमणे, त्यातील सदस्य संख्या ठरविणे. व त्यांना जरुर ते अधिकार देणे.
 18. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चया नियम १०७ सी मधील अटीस अधीन राहून सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/हिशोबनीस यांनी ठेवावयाच्या हात शिल्लकीची मर्यादा ठरविणे व संबंधितांवर जबाबदारी सोपविणे.
 19. फेडरेशनकडे आलेल्या रकमा नियमितरित्या बँकेत भरण केल्या जातात किंवा नाही ते पाहणे.
 20. सहकार खात्याचे मागविलेले अहवाल व इतर माहिती वेळेत पाठविण्याची व्यवस्था करणे.
 21. अंतर्गत हिशोब तपासणीसाकडून प्रत्येक तीन महिन्यांची संघाचे हिशोब तपासून घेणे.
 22. फेडरेशनचे कामकाज आवश्यकतेनुसार पदाधिकार्‍यामध्ये वाटून घेणे व त्यासंबंधीची जबाबदारी त्यांचेवर सोपविणे.
 23. समित्या-उपसमित्या यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे व मार्गदर्शन करणे.
 24. फेडरेशनच्या उद्देशपूर्तीसाठी व पतसंस्थांच्या आवश्यकतेनुसार फेडरेशनच्या वॉर्ड/जिल्हा शाखा कार्यालय अस्तित्वात आणणे.
 25. फेडरेशनच्या कामकाजाची धोरणे ठरविणे, साधारणता फेडरेशनच्या कामकाजाबाबत सारासार विचार करणे, जबाबदारीने फेडरेशनच्या हितसंबंधांची जपवणूक करुन निधीच्या सुरक्षिततेची काळजी घेणे.आणि सभासद पतसंस्थांच्या व आम जनतेच्या हितसंबंधांस बाधा न आणता फेडरेशनचा कारभार करणे.
 26. फेडरेशनच्या हिशोब वह्यामंध्ये दाखविलेली रोख रक्कम बाकी १५ दिवसांनी एकदा व फेडरेशनच्या इतर मालमत्ता सहा महिन्यांतून एकदा तरी पडताळून पाहण्यासाठी संचालक मंडळाच्या एका सदस्याला त्याच्या नांवाने अधिकार देणे. या सदस्याने आपल्या कामाचा अहवाल संचालक मंडळाच्या पुढील सभेत सादर करणे. अशा अहवालात जर रोख रक्कम अगर काही मालमत्तेत तूट आल्याचा उल्लेख केला असेल तर तूटीच्या अगर इतर मालमत्तेच्या वसुलीसाठी तत्परतेने कारवाई करणे.
 27. संचालक मंडळाने किंवा कोणत्याही अधिकार्‍याने कामकाज करीत असताना सदभावनापूर्वक केलेले कोणतेही कृत्य हे फेडरेशनच्या घटनेच्या किंवा संचालक मंडळाच्या रचनेत किंवा अधिकार्‍याच्या नेमणूकीत किंवा निवडणूकीत आढळून आलेल्या काही दोषामुळे किंवा अधिकारी त्या पदासाठी अपात्र होतो. किंवा केवळ या कारणावरुन अवैध्य आहे असे समजता कामा नये.
 28. शासकीय, निमशासकीय महामंडळे इत्यादीच्यांकडून जागा व इमारती कराराने निबंधकाच्या पूर्व परवानगीने खरेदीने, भाडयाने मिळविणे.
 29. वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व खर्चास मान्यता देणे.
 30. कर्मचाऱयांना कायदेशीर कारवाईमध्ये फेडरेशनच्या वतीने भाग घेण्याचा अधिकार देणे.
 31. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल संपण्यापूर्वी नवीन संचालक मंडळाची निवडणूक घेणे व तद्अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे.
 32. संचालक मंडळावरील तात्पुरत्या रिकाम्या झालेल्या जागा भरण्यासाठी अधिनियम, नियम व उपविधीप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणे.
 33. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीस अधीन राहून खालील बाबतीत वेळोवेळी नियम करणे, त्यात सुधारणा करणे, रद्द करणे अथवा बदल करणे.

 34. (अ) कर्मचार्‍याचे प्रवास भत्ते व इतर भत्ते.
  (ब) भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युईटी व बोनस.
  (क) सेवक नियम व शर्ती.
  (ड) फेडरेशनचे निवडणूक नियम.
  (इ) उपविधी.
  (ई) समित्या, उपसमित्या तयार करणे, त्यांची संख्या ठरविणे व त्यांना अधिकार प्रदान करणे
  तसेच अशा समित्यांचे काम पहाणार्‍याना योग्य ते पदनामावली बदल करणे.
 35. फेडरेशनच्या उद्देशास अनुसरुन सर्व व्यवहार अंगिकारणे व त्यासाठी प्रशासकीयदृष्टया आवश्यक लागणारी कृती करणे.
 36. फेडरेशनच्या वतीने करार व इतर महत्वाच्या दस्तऐवजांवर सह्या करणाचे अधिकार प्रदान करणे.
 37. आवश्यकतेनुसार सर्वसाधारण सभेच्या व निबंधकाच्या पूर्व परवानगीने संमतीने कर्मचाऱयांची पदे निर्माण करणे, त्यांची अर्हता ठरविणे, त्या पदावर योग्य व लायक उमेदवारांची निवड करणे, वेतनश्रेणी व इतर भत्ते ठरविणे.
 38. सर्वसाधारण सभेची तारीख, वेळ, जागा आणि त्यामध्ये करावयाचे कामकाज निश्चित करणे.
 39. सर्वसाधारणपणे फेडरेशनचा व्यवहार सांभाळणे.
 40. सर्वसाधारण सभेच्या संमतीने वेळोवेळी पतसंस्थांच्या हितासाठी नियम करणे, उपविधीतील तरतुदी सुधारणेसाठी शिफारस करणे. व इतर अनुषंगिक काम पतसंस्थांच्या हितासाठी करणे.
 41. पतसंस्थांचे राज्य फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ लि., पुणे, मुंबई जिल्हा मध्यवत्री सहकारी बँक लि., मुंबई, मुंबई सहकारी बोर्ड लि., मुंबई, सहकार व संबंधित आवश्यक क्षेत्रातील संस्थांचे, मंडळांचे, दैनंदिन-मासिक-त्रैमासिक-सहामाही-वार्षिक किंवा अजीव देखील सभासदत्व घेणे व सलग्न होणे.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved