Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
ग.१.१ नफा वाटणी
 1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नुसार संस्थेचा निव्वळ नफा काढला जाईल.
 2. संचालक मंडळाचे शिफारसीनुसार निव्वळ नफ्याची वाटणी सर्वसाधारण सभेत खालीलप्रमाणे करण्यात येईल.
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार नफ्याच्या २५ टक्के पेक्षा कमी नाही इतका नफा वैधानिक राखीव निधीत जमा केला जाईल व त्याची स्वतंत्र गुंतवणूक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत केली जाईल.
  • महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतूदीत नमूद केलेल्या कमाल मर्यादेस पात्र राहून लाभांश देण्यासाठी तरतूद केली जाईल.
  • नफा-तोटा हिशोब पत्रकात इमारत निधी, विकास निधी, सेवक कल्याण निधी व धर्मादाय निधी यांची तरतूद करता येतील. (त्याचप्रमाणे निव्वळ नफ्यातून इतर निधीची रक्कम उभारता येईल.)
  • फेडरेशनने निव्वळ नफा काढण्यापूर्वी ढोबळ नफ्यातून संशयीत व बुडीत कर्जासाठी तरतूद करावी.
ग.१.२ राखीव निधी
 1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील नियम आणि उपविधी यात नमूद केलेल्या रकमेशिवाय राखीव निधीत, प्रवेश फी, भाग वर्ग करण्याची फी, जप्त केलेल्याभागाची रक्कम, जप्त केलेल्या लाभांशाची रक्कम, या रकमा जप्त केल्या जातील.
 2. राखीव निधीची गुंतवणूक व विनियोग महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ६६ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम ५४ मधील तरतूदीनुसार करण्यात येईल.
ग.१.३ लाभांश
 1. लाभांशाची रकम ही ज्या सहकारी वर्षाची संबंधित असेल त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी सदरहू भाग ज्याचे नावाने संस्थेच्या पुस्तकात असतील त्यांना देण्यात येईल.
 2. लाभांश जाहीर केल्यानंतर तीन वर्षाच्या आत लाभांशाची रक्कम न घेतल्यास ती रक्कम जप्त करुन राखीव निधीत जमा केली जाईल.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved