Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
ह.१.१ दफ्तर व हिशोब
महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम ६५ मध्ये विहीत केल्याप्रमाणे ठेवावयाच्या वह्या पुस्तके व नोंद वह्याखेरीज संचालक मंडळाला आवश्यक वाटेल तशा किंवा निबंधकाने आदेश दिल्याप्रमाणे किंवा संस्थेच्या हिशोब तपासणीसांनी शिफारस केल्याप्रमाणे इतर नोंद वह्या हिशोबाच्या वह्या व खाते वह्या ठेवण्यात येतील.
ह.१.२ वैधानिक लेखापरिक्षण
महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे कलम ८१ नुसार नेमलेल्या लेखापरिक्षकांकडून लेखापरिक्षण करुन घेण्यात येईल.
ह.१.३ फेडरेशनचा मोहर (सील)
फेडरेशनचे मोहर (सील) तयार करण्यात येईल व तो सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/ मानद सचिव यांच्या ताब्यात राहील. सदरहू मोहर (सील) एका संचालकाच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या ठरावाप्रमाणे वापरतील.
ह.१.४ उपविधी दुरुस्ती
  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १३ व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम १२ मध्ये दाखविलेल्या कार्यपद्धतीनुसार उपविधीत कोणताही बदल करता येईल. रद्द करतो येईल किंवा त्याऐवजी नवी उपविधी स्विकारता येईल.
  2. वरील (१) प्रमाणे मंजूर झालेल्या उपविधीची अंमलबजावणी नोंदणी अधिकार्‍याची लेखी मंजूरी मिळाल्याचे तारखेपासून होईल.
  3. उपविधी दुरुस्तीबाबतच्या सभेची नोटीस १४ दिवसा अगोदर सभासदांना पाठविली पाहिजे.
ह.१.५ रोख शिल्लक
संस्थेच्या दैनंशि कामकाजासाठी व्यवस्थापक समितीने ठरविलेल्या मर्यादेपर्यंत रोख रक्कम ठेवता येईल याची जबाबदारी संचालक मंडळाच्या ठरावानुसार निश्चित करेल. रोख रक्कमेची नोंदवही ठेवली जाईल. व त्यावर अध्यक्ष/मानद सचिव यांची सही घेतली पाहिजे. रोख शिल्लकेसाठी अधिकृत व्यक्ती/अध्यक्ष व मानद सचिवांसह संयुक्तरित्या जबाबदार राहतील. फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजासाठी नियम १०७ क मधील तरतूदीप्रमाणे यामध्ये जी रक्कम कमी असेल त्या मर्यादेपर्यंत रोख रक्कम ठेवता येईल.
ह.१.६ फेडरेशनचे कामकाज गुंडाळणे
फेडरेशनचे व्यवहार बंद करणेचे वेळी फेडरेशनच्या अधिकृत मालमत्तेची विभागणी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम ९० च्या तरतूदीस अनुसरुन केली जाईल.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved