Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन हे नियमीतपणे पतसंस्थांमधील पदाधिकारी, संचालक आणि कर्मचारी यांना शिक्षण-प्रशिक्षण देत असते. फेडरेशन पतसंस्था परिवार हे सन २००० रोजी फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री.शिवाजीराव नलावडे - संपादक असलेले मासिक प्रति महिना प्रसिध्द करीत असते. या पतसंस्था परिवारचा अंक प्रामुख्याने मुंबईतील पतसंस्थांना गेली ११ वर्षांपासून प्रति महिना नियमीतपणे उपलब्ध करून दिला जातो. या पतसंस्था परिवार मासिकामध्ये शासनाचे व सहकार खात्याचे वेळोवेळी प्रसिध्द होणारे जी.आर, परिपत्रके व विविध माहिती सभासदांपर्यंत पोहोचविण्याचे काम फेडरेशन करीत असते. प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते सायं. ५ पर्यंत सभासद पतसंस्थांच्या थकबाकीदारांची वसुलीसाठीचे मार्गदर्शन केंद्र सुध्दा फेडरेशन चालविते. फेडरेशनकडे ३१ मार्च २०११ अखेर एकूण ३ एसआरओ असून सभासद संस्थांना याचा थकबाकी वसुल होणेकामी उपयोग करून दिला जातो. फेडरेशनचे एकूण २९ संचालकांची संख्या असून कार्यकारी समिती, शिक्षण-प्रशिक्षण समिती इत्यादी समित्यांमार्फत कामकाज चालविले जाते. तसेच मुंबई एकूण २० को-ऑप. वॉर्ड व ३ जिल्हे असल्यामुळे वॉर्ड व जिल्हास्तरावर सुध्दा समित्यांमार्फत सेवा पुरविण्याचे काम सुध्दा फेडरेशन करते. फेडरेशनने पतसंस्था परिवार या मासिकाबरोबरच खालिल पुस्तके प्रकाशित केली आहेत
  1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ (२६-१-१९६२ पासून लागू - प्रथम प्रशिक्षण आवृत्ती)
  2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ (महाराष्ट्र विनिर्दिष्ट सह. संस्थांच्या समित्यांवरील निवडणुका नियम, १९७१ - द्वितीय प्रशिक्षण आवृत्ती)
  3. नागरी सहकारी पतसंस्थांचे ६०० गुणांचे लेखापरीक्षण निकष ‘अ’, ‘ब’, ‘क’ , ‘ड’
  4. सहकारी संस्थांची वसुली, वसुली व विक्री अधिकारी
  5. सहकारी संस्थांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी नेमके काय करावे?
व आत्ता पतसंस्थांमधील थकबाकीला आळा बसविण्यासाठी कायद्याप्रमाणे थकबाकीदार म्हणून जाहिर झालेल्या थकबाकीदार व त्यांच्या जामिनदारांची नावे व इतर माहिती www.mahasahakar.com च्या “वेबसाईटद्वारे” सभासदांसाठी उपलब्ध करून देण्यात येण्याचे कामकाज फेडरेशनने चालू केले आहे. आणि यासाठी प्रथम मुंबईतील पतसंस्थांना समाविष्ट करून घेऊन याची व्याप्ती संपुर्ण राज्यभर करण्याचा मानस फेडरेशनचा आहे. त्यामुळे फेडरेशनची सभासद पतसंस्था फेडरेशनच्या ह्या वेबसाईटसाठी नोंदणी झाल्यानंतर त्या पतसंस्थेला त्यांचेकडील सहकार कायद्याच्या कलम ९१ व १०१ नुसार प्राप्त झालेले अँवॉर्डच्या वेबसाईटमार्फत इतर सर्वांना माहिती करून घेता येतील. त्यामुळे संबंधित थकबाकीदार व त्यांचे जामिनदार यांची नावे व त्यांनी केलेल्या थकबाकीच्या रकमा आपोआप सर्वांना माहित होणार आहेत. आणि त्या थकीत रकमा भरल्याशिवाय त्यांना कुठलीच पतसंस्था कर्ज देऊ शकणार नाही. कारण ज्यांचे यापुर्वी कुठल्याही पतसंस्थेत थकबाकीदार असल्याचे जाहिर झाले आहे, त्यांना दुसरी पतसंस्था कर्ज देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे चित्र तयार होत आहे. यासाठी www.mahasahakar.com ही वेबसाईट पतसंस्थांच्या थकबाकीसाठी संजिवनी ठरणार आहे. शिवाय याच वेबसाईटमध्ये निगोशिएबल इन्स्टुमेंट अॅक्ट च्या कलम १३८ नुसार बाऊंस झालेल्या धनादेशच्या निकालासंदर्भात सुध्दा माहिती उपलब्ध करीत आहोत. एकंदरीत बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन ही सर्व सामान्य सहकारी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या पतसंस्थांची “युनियन” म्हणून कायदा व नियमानुसार नियमितपणे दैनंदिन काम करीत आहे. आणि हेच वैशिष्ठ सहकाराचे आहे. त्याचा उपयोग सहकार चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने घेत असल्यामुळे हे फेडरेशन सर्वमान्य व लोकाभिमुख झालेले आहे.

जय हिंद ! जय महाराष्ट !! जय सहकार !!!
 
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved