Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 

   व्यक्तीच्या भौतिक प्रगतीची वाढ सहकाराच्या खर्‍याखुर्‍या आचरणाने होईल. तशी नैतिक पातळीही निश्चितपणे उंचावेल. भौतिक समृध्दीची वाटचाल करणारी व्यक्ती नैतिकतेकडे लक्ष देतेच असे नाही. किंबहुना त्याकडे ती दुर्लक्षच करते. परंतु ‘सहकार’ मार्गाचा अवलंब करताना सेवाभावाचे पथ्य कटाक्षाने पाळावयाचे असल्याने व सहकारी वृत्ती बाणावयाची असल्यामुळे तसेच आपली प्रगती करून घेत असता कोणीही दुर्बल व्यक्तीचे अपहरण करीत नाही ना ? याचा सदैव विचार करावयाचा असल्यामुळे भौतिक समृध्दीतेबरोबर नैतिक पातळीही उंचावेल. अर्थात सहकारात कार्य करणार्‍या सर्व व्यक्तींनी याचे यथोचित पालन केले तरच ते शक्य आहे, नाही तर खाजगी भांडवलदारांऐवजी सहकाराच्या गोंडस नावाखाली नव्या भांडवलदारांचा वर्ग समाजावर कुरघोडी करणारा उभारला जाऊ शकतो. कधी कधी ती भिती उत्पन्न होते म्हणून शासन निर्बंध घालते. भारतासारख्या गरीब देशातील दुर्बल समाजाने आपली प्रगती करून घेणयासाठी सहकारी कास धरणे जरूर आहे. ती काळाची गरज आहे.

‘सहकारी चळवळ’ ज्या तत्वावर आधारलेली आहे त्या तत्वांची कल्पना आल्यानंतर सहकारी तत्वावर कार्य करणार्‍या व्यक्ती एकत्र येऊन कार्य करण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याचे अस्तित्व कायद्याने मानले पाहिजे. म्हणून सहकारी संस्था अधिनिमात तशी तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा महाराष्ट्र राज्यासाठीचा सहकार कायदा आहे. कंपनी कायदा याचा चेहरामोहरा कधी कधी एकसारखा वाटला तरी कंपनी कायदा हा केंद्रीय कायदा आहे. कोणत्याही तरतुदी या कायद्यानुसार स्थापन झालेल्या सहकारी संस्थेस लागू होत नाहीत, असे त्या कायद्याच्या १६७ व्या कलमात सांगितले आहे. तसेच केंद्र सरकारचा सहकारी कायदा आहे, पण जेव्हा एखादी सहकारी संस्था आंतरराज्य व्यवहार करते (inter state) त्यावेळी तो कायदा अंतरराज्यीय संस्थांना लागू होण्याचा प्रश्न येतो. आपल्या राज्यापुरते कार्यक्षेत्र असणार्‍या सहकारी संस्थांना तो लागू होत नाही.

सहकारी चळवळीची वाढ वेगाने होत आहे. ज्यावेळी एखाद्या चळवळीची वाढ वेगाने होते त्यावेळी त्यात चांगल्याबरोबर वाईट प्रवृत्तीही शिरतात. सहकारात वाईट प्रवृत्तीची वाढ ही सहकारी चळवळीला लागलेली किड आहे, त्यामुळे ती बदनाम होऊ शकते. वास्तविक सहकारी चळवळ राजकारण्यांपासून व राजकारणापासून संपूर्णपणे दूर असली पाहिजे.

सहकारी चळवळीने सामाजिक कार्य करून सहकारी कार्यपध्दतीत आपली उन्नती, प्रगती करून घेता येते. ही सर्व वैचारिक बैठक व्यक्तींनी जी सहकार क्षेत्रात शिरतात त्यांनी सदैव ध्यानात ठेवावयास हवी. सहाकरी चळवळ ही वास्तविक उस्फूर्त चळवळ असावी, ही चळवळ व्यक्तीची व त्याबरोबरच समाजाची चळवळ असावी. ज्याप्रमाणे तत्वत कायद्यासमोर सर्वांना समान लेखले जावेत असा उद्देश असतो आणि त्याप्रमाणे ते समान लेखले जातात. त्याचप्रमाणे सहकार म्हणजे ज्यामध्ये सर्वांचे सहकार्य असते त्यात गरीब - श्रीमंत हा भेदभाव नाही. “सहनाववतु सहनौ भुन्gनक्त्मतु सहवीर्य कारवावहै” हे सुत्र वैदिक धर्माने घालून दिले आहे व सर्व धर्मात हे या ना त्या रूपात सांगितले आहे, हे सूत्र सहकारात तंतोतंत पाळले तर समाज विकास ही फार दूरवरची गोष्ट असणार नाही, त्या समाजाचा विकास होणारच आहे. सहकारी चळवळ हि लोकशाहिची चळवळ आहे. सर्व निर्णय चर्चेने होणे आवश्यक असते. चर्चा याचा अर्थ आपलेच खरे व बाकी सर्व चूक अशा अर्थाची नसावी. चर्चेमुळे जो चांगला कार्यभाग साधावयाचा आहे तो अशा वृत्तीमुळे कधीच साध्य होणार नाही, चर्चा म्हणजे चढाओढ नव्हे.

 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved