Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 

   जय जवान, जय क्किसान, जय विज्ञान आणि समाजाला एकत्र आणणारा सहकार ! सहकाराशिवाय आपला उद्धार कधीही होणार नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात त्या समाजातील एकमेकांना आपण छोटे छोटे सहकार्य केले तर जीवन सुसह्य होते, याचा अनुभव आपणास असतोच. शेजार्‍याने आपल्या घरातील केर दुसर्‍या शेजार्‍याकडे टाकला तर त्याचे घर स्वच्छ होईल पण दुसर्‍याचे घर घाण होणार नाही का? एकाने रस्त्यावर केळाचे साल टाकले व दुसर्‍या गृहस्थाचा त्याच्यावर पाय पडला तर एखाद्या वेळेस त्याचा पाय घसरून त्याचा पाय मोडण्याची शक्यता नाही का? आपण स्वच्छता राखण्याचे सहकार्य करणे आवश्यक नाही का? अशी असंख्य उदाहरणे देता येतील. प्रत्येकाच्या जीवनात सहकार, सहकार्य हे शब्द नेहमीच येतात व ते आपल्या अंगी बाणवणे आवश्यक आहे. थोडेडक्य्माात सहकाराचा संस्कार होणे, यावर सहकारी चळवळ यशस्वी होण्यावर भर असला पाहिजे.

एकत्र आल्यानंतर आपले कार्य कसे करावे? ते कसे चालावे? वगैरे संबंधीचे नियमन करणे आवश्यक असते. सहकारी प्रवृत्ती असणे जसे आवश्यक आहे तसेच सहकार्याने एखादी संस्था चालवली जाते त्याप्रमाणे तिची कृती होते, त्यावेळी त्यासंबंधी काही नियम, निर्बंध असणे आवश्यकता असते. सहकारी कार्यात जे कार्य संस्था म्हणून सुरू होते त्या संस्थेला या कायद्यानुसार केलेल्या नियमांच्या चौकटीत राहून कार्य करावे लागते. सहकारी तत्वानुसार कार्य करणार्‍या संस्थेचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाने निबंधक, सहकारी संस्था या शासकीय अधिकाऱयांची नेमणूक केली जाते. शासनाने केलेल्या कायद्याचे नाव महाराष्ट्र सहकारी संस्था अध्धिन्नियम १९६० व त्याखालील न्नियम १९६१ , त्यानुसारच शासनाला जे अधिकार कायदेमंडळाने दिले आहेत.

तसेच, जी सहकारी संस्था या कायद्यान्वये स्थापन होऊ घातलेली आहे. त्या संस्थेत आपला संस्था स्थापन करण्याचा हेतू काय आहे? यासंबंधीचे निवेदन सुरूवातीस द्यावयाचे असते. याबाबतीत ‘पतसंस्था ’ असेल तर त्या पतसंस्थेने आपल्या संस्थेचा उद्देश कोणता आहे? भाग-भांडवल किती आहे? सभासदत्वासाठी किती मर्यादेपर्यंत भाग भांडवल घ्यावे लागेल?.... वगैरे बाबीं संबंधीचे निवेदन त्या उपविधीत असते. त्या नंतरचे संस्थेचे कामकाज कसे चालेल? यासंबंधीचे निवेदन असेल. संस्थेचे कामकाज पहिल्या प्रथम सभेत ज्यांनी संस्था स्थापन केली आहे, त्या प्रवर्तकांमार्फतच होणार त्यासाठीची योजना म्हणजे समितीची रचना कशी असेल? समितीची स्थापना करण्यासाठीची कोणती रीत असेल ? सभासदांचे हक्क, अधिकार, जबाबदार्‍या यासंबंधीचे निवेदन असेल. कर्ज कोणास मिळेल? त्यासाठी जामिनदार असणे आवश्यक आहे व तोही संस्थेचा सभासद असला पाहीजे, इत्यादी बाबी त्या उपविधीत असतात.

सहकारी संस्थांचे १५ प्रकारात वर्गीकरण केले आहे. त्या प्रत्येक वर्गीकरणानुसार संस्थेचा उद्देश त्या वर्गीकरणाशी सुसंगत असतो.

 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved