Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती

अधिनियम होते, तर मराठवाड्यासाठी हैद्राबाद को-ऑप. सोसायटीज अँक्ट १९५२, हैद्राबाद लॅण्ड मॉर्गेज बँक अँक्ट असे अधिनियम होते. नव्या राज्याच्या नव्या धोरणानुसार समग्र सहकारी अधिनियम बदलून तो सुधारून नवा एकत्रित अधिनियम अंमलात आणने जरूरी झाले. म्हणून हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अस्तित्वात आला.

शासनाने यावर आधारित पोटनियमा सहकारी संस्थांसाठी “आदर्श पोटनियम किंवा तयार केलेले आहेत.

    “बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई ची स्थापना

भारतातील सहकारी चळवळ व महाराष्ट्र राज्यातील सहकारी चळवळ यांचा एकत्रितपणे अभ्यास केला तर महाराष्ट्र राज्य हे सहकार चळवळीत अग्रगण्य राज्य असल्याचे निदर्शनास येईल. महाराष्ट्राबरोबर गुजरात, कर्नाटक व तामिळनाडू या प्रमुख तीन राज्यांमध्ये सहकाराची आवश्यक वाढ होताना लक्षात येते. परंतु महाराष्ट्र राज्य हे सहकाराच्या बाबतीत संख्येने क्रमांक एकचे राज्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर असून महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ११.५ कोटी पर्यंत पोहोचलेली आहे. ४२ टक्के लोक शहरात राहत असून ५ ८ टक्के लोक जरी ग्रामीण भागात राहत असले तरी सहकाराचा अवाका व प्रसार सर्वत्र पोहोचलेला दिसतो. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जवळ-जवळ सर्वच प्रमुख जिल्हा व वित्तीय संस्था यांची मुख्यालये ह्याच मुंबई शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व प्रमुख बाजार व प्रमुख विक्री वस्तु व्यापार केंद्रे सुध्दा मुंबईतच आहेत आणि त्यामुळे खाजगी वित्तीय संस्था व सहकारी वित्तीय संस्था यांची भरभक्कम केंद्र हे मुंबईच झाले आहे. आणि अशा मुंबई शहरात सहकारी संस्थांचा व्याप किती आहे, हे माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

३१ मार्च २०१० अखेर मुंबई शहरातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाची संख्या २९,५२८ इतकी झाली असून दरवर्षी त्यामध्ये मोठ्या संख्येने भर पडत चाललेली आहे. मुंबई शहरातील सहकारी संस्था प्रकारानुसार

आकडेवारी खालीलप्रमाणेः
अ.क्र. संस्था प्रकार जि.उ.निबंधक १  जि.उ.निबंधक २ जि.उ.निबंधक ३ एकूण
बँका       ५३ १० ७१
नोकरदार बँका १०
नोकरदार पतसंस्था ४८३ १७४ १२८ ७८५
नागरी सह. पतसंस्था ५९८ ६४२ ६५० १८९०
औद्यो. सह. संस्था    १६३ ४६२ २५३ ८७८
मध्य.सह.ग्राहक संस्था      ११ ११ २८
प्राथ.सह.ग्राहक संस्था १४७ १७२ १२० ४३९
मजूर सह. संस्था ३४४ १९४ २२२ ७६०
गृहनिर्माण सह. संस्था ३४६३ ४१५६ १३२१५ २०८३४
१० वाहतूक सह. संस्था  १२ २१
११ इतर प्रकारच्या सह.संस्था १०५६ १०९२ १६६४ ३८१२
  एकूण ६३३७ ६९१५ १६२७६ २९५२८

महाराष्ट्र राज्यात ३१ मार्च २०१० अखेर २ लाख १८,००० सहकारी संस्था नोंदणीकृत असून ५ कोटी ३९ लाख त्यामध्ये सभासद आहेत. व यामध्ये बिगर कृषी पतपुरवठा म्हणजेच नागरी / ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांची संख्या २३,८३९ असून सभासद संख्या २ कोटी ३९ लाख आहे. पतसंस्थांचा इतर तपशील खालिलप्रमाणेः-

 
तपशील ३१ मार्च रोजी (कोटी रुपये) शेकडा बदल
  २००९ २०१०  
संस्था (संख्या) २४,१६७ २३,८३९ (-) १.४
सभासद (लाख) २२३ २३९ ७.२
ठेवी ५६,७३२ ५९,५९७ ५.१
स्वनिधी १६,४०१ १८,३७१ १२.०
भाग भांडवल    ७,०६८ ८,१९८ १६.०
त्यापैकी, राज्य शासनाचे  १२.५
खेळते भांडवल १,१४,३२९ १,३१,३०७ १४.९
कर्ज वाटप ५२,१९४ ५२,२१९ नगण्य
येणे कर्ज  ४८,७२६ ३७,०२४ (-) २४.०
थकित कर्ज     ७,९९० ८,१३३ १.८
कर्ज वसुली ४४,६६८ ४६,३९१ ३.९
तोट्यातील संस्था (संख्या) ६,१३९ ६,१६० ०.३
तोट्याची रक्कम ४३४ ४८० १०.६
 
बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना ३ जुलै ११८६ रोजी झालेली असून नोंदणी क्रमांक : बी.ओ.एम./(बी.ओ.एम.)आर.एस.आर./(ए.एन.सी)/१०१/८६-८७) असा आहे. फेडरेशनचा नोंदणीकृत पत्ता : ११२, सौरभ बिल्डींग, चिरागनगर घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई - ४०००८६ असून फेडरेशनचे कार्यक्षेत्र संपुर्ण बृहन्मुंबईसाठी आहे. त्यामध्ये मुंबई शहर (१), मुंबई पुर्व उपनगरे (२) व पश्चिम उपनगरे (३) या तिन्ही जिल्हयातील सर्व नागरी सुरक्षर पतसंस्था या फेडरेशनच्या अंतर्गत येतात. आणि संपुर्ण मुंबईसाठी हे फेडरेशन आपले कामकाज फेडरेशनचे उपविधी त्यातील ध्येय व उद्दीष्टांप्रमाणे करते. ३१/३/२०११ फेडरेशनचे ११८२ सभासद असून त्याचे ध्येय उद्दीष्टांप्रमाणे फेडरेशन नियमीतपणे काम करीत असते. फेडरेशनचा अद्यावत उपविधी  दि. ३१ मार्च २०११ अखेर खालिलप्रमाणे आहे.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved