Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
अ.१.१ संस्थेचे नांव आणि पत्ता :

संस्थेचे नांव “ बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई ” असे राहील. पत्ता :- ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, चिरागनगर पोलीस स्टेशन समोर, एल्.बी.एस्.मार्ग, घाटकोपर(प.), मुंबई - ४०००८६.

अ.१.२ संस्थेचे कार्यक्षेत्र

संस्थेचे कार्यक्षेत्र बृहन्मुंबई पुरते मर्यादित राहील.

अ.१.३ पत्त्यात झालेला बदल

नोंदविलेल्या पत्त्यात झालेला कोणताही फेरबदल असा झालेल्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱयांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ३७ अन्वये कळविला पाहिजे. असा झालेला बदल महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चा नियम ३१ मधील तरतुदीनुसार केला पाहिजे. उपविधीत दुरुस्ती करुन ती नोंदली गेल्याशिवाय तो बदल नोंदला आहे असे समजता येणार नाही.

अ.१.४ संस्थेचे वर्गीकरण आणि उपवर्गीकरण :

संस्थेचे वर्गीकरण ‘ सर्वसाधारण संस्था ’ असून उपवर्गीकरण ‘ इतर संस्था ’ असे राहील.

अ.१.५ याख्या
  1. या उपविधीमध्ये जेथे अधिनियमनियम असा उल्लेख करण्यात आलेला आहे तेथे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या अनुषंगोन तयार करण्यात आलेले महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ असे समजले जाईल.
  2. शासन म्हणजे महाराष्ट्र शासन.
  3. निबंधक म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या तरतुदीनुसार नेमण्यात आलेला सहकारी संस्थांचा निबंधक.
  4. सभासद म्हणजे संस्थेच्या नोंदणीसाठी करण्यात आलेल्या अर्जात सहभागी होणारी नागरी सहकारी पतसंस्था अथवा नोंदणीनंतर ज्याने सभासदत्व स्वीकारले आहे अशा नागरी सहकारी पतसंस्थांचा समावेश असेल.
  5. संस्था म्हणजे “बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई”
  6. फेडरेशन म्हणजे “बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई” असे सुद्धा समजण्यात येईल.
  7. पतसंस्था म्हणजे “बृहन्मुंबईतील नागरी सहकारी पतसंस्था”
  8. सहकार वर्ष म्हणजे ३१ मार्च राजी संपणारे वर्ष.
  9. सरव्यवस्थापक/महाव्यवस्थापक/व्यवस्थापक लेखनिक/अकांउन्टट/कॉम्प्युटर ऑपरेटर/शॉर्टहँड टायपिस्ट/शिपाई म्हणजे फेडरेशनच्या व्यवस्थापक समितीने नेमणूक केलेली पगारी व्यक्ती.
  10. पदाधिकारी म्हणजे उपविधीनुसार संस्थेच्या संचालक मंडळावर निवडणुकीने आणि किंवा नेमणूकीने आलेली व्यक्ती.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved