Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 

संघाचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत.

 1. सभासद पतसंस्थांना सहकारी तत्वाचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे.
 2. कार्यक्षेत्रातील पतसंस्थांच्या रकमा त्यांनी दिलेल्या सुचनांनुसार दणे व घेणेकरिता मध्यवर्ती केंद्र म्हणून कार्य करणे.
 3. फेडरेशनच्या निधी व मालमत्तेचे व्यवस्थापन करणे. ती सुरक्षित ठेवणे आणि तिचा कारभार पहाणे
 4. पतसंस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि अधिकारी-कर्मचारी व पतसंस्थांचे सभासद यांचेसाठी शिक्षण प्रशिक्षणांची सोय उपलब्ध करणे व त्यासाठी आवश्यक त्या साधन-सुविधा उपलब्ध करणे.
 5. बृहन्मुंबईतील पतसंस्थांच्या परिषदा व सभा बोलावून त्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने विचार करणे व यासाठी प्रयत्न करणे व त्यासाठी उपाययोजना करणे.
 6. सभासद पतसंस्थांना आर्थिक व व्यवहारासाठभ् सल्ला देणे, व त्यांना येणार्‍या अडीअडचणीसंबंधी विचार विनियम करणे.
 7. सभासद पतसंस्थांच्या व्यवहाराच्या वाढीसाठी झटणे व त्यांच्या कर्मचाऱयांच्या प्रशिक्षणासंबंध्भ् व्यवस्था करणे.
 8. पतसंस्थांकडून वार्षिक आर्थिक पत्रके मागवून ती सर्व माहिती संकलित करणे व प्रसिद्ध करणे.
 9. सभासद पतसंस्थांना दैनंदिन व्यवहारासाठद लागणारे फॉर्मस्, हिशोब-पुस्तके वैगरे स्टेशनरी मागणीप्रमाणे उपलब्ध करुन देणे. व तशा स्वरुपाची कामे हाती घेणे.
 10. सभासद पतसंस्थांच्या व्यवहाराला पोषक असे अद्यावत वाचनालय स्थापन करणे, चालविणे व त्याबाबत जरुर तो निर्णय करणे. तसेच मासिक/त्रैमासिक/पाक्षिक/दैनिक नोंदणी करुन घेणे व ते चालविणे.
 11. सहकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी योजना आखणे व जरुर तो प्रयत्न करणे.
 12. सभासद पतसंस्थांच्या हितासाठी प्रयत्न करणे.
 13. सभासद पतसंस्थांना कर्जपुरवठा संबंधी मार्गदर्शन करणे, अडचणी उत्पन्न झाल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. व त्यासाठी आर्थिक व तांत्रिक माहिती पुरवून सल्ला देणे.
 14. फेडरेशनसाठी जागा भाडयाने घेणे, विकत घेणे व जागेसंबंधी अन्य उपाययोजना करणे.
 15. फेडरेशनच्या कार्यासाठी लागणारा निधी, वर्गणी - देणगी - जाहिरात स्वरुपात गोळा करणे.
 16. वरील उद्देश पुर्ततेसाठी जरुर त्या गोष्टी करणे.
 17. सभासद पतसंस्थांच्या वतीने त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या कामी मा. सचिव, सहकारी व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई सहकारी बोर्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पतसंस्थांचे राज्यस्तरीय फेडरेशन, पतसंस्थांचे केंद्रस्तरीय फेडरेशन इत्यादी आवश्यक ठिकाणी प्रतिनिधीत्व करणे. तसेच पतसंस्थांच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारी इतर कामे करणे.
 18. सभासद पतसंस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी शासन / निबंधकाचे मान्यतेने उपाय योजना हाती घेणे.
 19. बृहन्मुंबईतील पतसंस्थांच्या जागेबाबत, थकबाकीबाबत अथवा अन्य कोणत्याही कारणाकरिता येणार्‍या कायदेशीर अडचणी सोडविण्याकरिता कायदेविषयक सल्लागार यांची नियुक्ती करणे.
 20. उपरोक्त सर्व किंवा एखादा उद्देश साधण्यासाठी लागणार्‍या अनुषंगिक सर्व गोष्टी करणे.
 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved