Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
फेडरेशनच्या संदर्भात माहिती
 
क.१.१  निधी उभारण्याचे मार्ग :
फेडरेशनचे निधी खाली दिलेल्या मार्गांनी उभारले जातील.
१)  भाग-भांडवल  (२)  प्रवेश शुल्क  (३)  वर्गणी  (४)  देणग्या  (५)  अनुदान (६)  जाहिराती   (७)  मासिक, माहिती पुस्तके इत्यादीद्वारे (८)  वेळोवेळी ठरविलेल्या इतर अन्य कायदेशीर वर्गणी.
क.१.२   फेडरेशनचे अधिकृत भाग भांडवल

फेडरेशनचे अधिकृत भाग भांडवल रुपये २५,००,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस लाख फक्त) असेल. प्रत्येक भागार्च दर्शनी किंमत रु. १००/- राहील. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम २८ मधील तरतुदीस अधीन राहून एका सभासदास जास्तीत जास्त शंभर भाग धारण करता येतील.

क.१.३  

प्रत्येक सभासदाने अंशदान केलेल्या भागाचा दाखला फेडरेशनने त्याचे भाग मंजूर केल्यापासून तीन महिन्याच्या आत त्या सभासदास, भिन्न अनुक्रमांक असलेले, सभासदाचे नांव दर्शविणारे, भागांची संख्या व रक्कम दर्शविणारे भाग पत्र देण्यात येईल. प्रत्येक भाग पत्रावर संस्थेच्या नावाचा शिक्का (सील) उठविण्यात येईल. त्यावर संघाचे अध्यक्ष, मानद सचिव व व्यवस्थापक समितीने रितसर अधिकार दिलेल्या अधिकार दिलेल्या संचालक मंडळाचा समिती सदस्य, यांच्या सह्या असतील.

 
 
१० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९   पुढे >>
 
 
 
Copyright 2011. All right reserved